पं. विठ्ठलराव सरदेशमुख..संस्कृत पंडित, सुरेशबाबू माने यांची तालीम मिळालेले गायक आणि उत्तम संवादिनी वादक. अनेक नामवंत शास्त्रीय गायकांना त्यांनी संवादिनीवर साथ केली. पण एक तेजस्वी व्यक्तिमत्व असे होते ज्याने ते सर्वाधिक भारावून गेले. ते व्यक्तिमत्व म्हणजे पं. कुमार गंधर्व. त्याच गाण्याचा वारसा आम्हाला दिला पं. विजय सरदेशमुख यांनी. कुमारजींच्या गाण्यावर प्रेम करणारी आमची ही तिसरी पिढी. अलीकडेच विठ्ठलरावांनी लिहून ठेवलेल्या कुमारजींच्या मैफलींबद्दलच्या आठवणी आम्हाला मिळाल्या. यात संगीताचं समीक्षण नाही. मग हा शब्दप्रपंच कशासाठी? यामागची आमची भावना ही त्या संगीतसूर्याला आणि त्याचं महत्व आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आमच्या पूर्वजाला आदरांजली वाहणे ही आहे. आणि त्याचबरोबर नवीन वाचकांना या आठवणी वाचून कुमारजींचं संगीत ऐकण्याची आणि समजून घ्यायची इच्छा होईल अशी आशा आहे.
आमच्या पाठीशी सदैव असणाऱ्या बैठक फाऊंडेशन चे आम्ही ऋणी आहोत.
– सरदेशमुख परिवार
इतर दुवे:
डॉ. चैतन्य कुंटे ह्यांनी लिहिलेला चरित्रकोशातील पं.विठ्ठलराव सरदेशमुखांनवरचा एक लेख.
कुमार गंधर्व यांच्या विविध मुलाखती – सगळ्या मिळून ५ तास.
श्री. मोहन नाडकर्णी ह्यांनी कुमार गंधर्वांनवर लिहिलेला लेख.
कुमंजींवर उत्तम माहिती देणारी एक वेबसाईट – http://kumarji.com/