Baithak Foundation believes that music exposure and education are as important as mainstream education.

Since 2016, we are working towards creating a society with equitable music access and learning opportunities for children from the most marginalised communities.

Nanhe Kabir: A Group Singing and Dance Competition

Baithak Foundation is pleased to announce state-level group singing and dance competition

The competition is open for schools, singing and dance classes in Maharashtra. Winners get exciting prizes and an opportunity to perform in the Pune Kabir Festival happening in February 2025

The Baithak Foundation has been working since 2016 to bring traditional art forms to children in government schools. Additionally, the Baithak Foundation organizes the Pune Kabir Festival every February. Through this festival, our aim is to spread the thoughts of Sant Kabir and other saints to everyone. The Pune Kabir Festival is presented over two days through four different programs in Pune.

For next year’s Pune Kabir Festival, we are organizing a group singing and dance competition titled ‘Nanha Kabir’ for students from schools across Maharashtra. The rules for the competition are as follows:

बैठक फाउंडेशन 2016 पासून शासकीय शाळांमधील मुलांपर्यंत पारंपारिक कलाप्रकार पोहोचवण्याचे कार्य करीत आहे. यासोबतच बैठक फाउंडेशन दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुणे कबीर महोत्सवाचे आयोजन करते. या महोत्सवा अंतर्गत संत कबीरांसहित संतांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे. चार विविध कार्यक्रमांद्वारे दोन दिवस पुण्यात पुणे कबीर महोत्सव सादर केला जातो.


पुढील वर्षीच्या पुणे कबीर महोत्सवासाठी आम्ही महाराष्ट्रभरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘नन्हे कबीर’ या समूह नृत्य व गायन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. स्पर्धेची नियमावली पुढील प्रमाणे आहे.

Competition Rules: Singing

  1. Participants wishing to enter the competition must read all the rules carefully.
  2. Each group can consist of 3 to 8 students.
  3. The age limit for the competition is 8 to 16 years.
  4. In this group singing competition, you may sing any compositions of Sant Kabir or other saints.
  5. The deadline for filling out the form is November 30.
  6. After submitting the form, the Baithak Foundation will contact the schools.
  7. The video of the song performed by the children must be submitted before December 20.
  8. The results of the competition will be announced in the first week of January.
  9. The final round of the competition will take place as part of one of the events at the Pune Kabir Festival.
  10. Prior to the final round, selected participants will also receive guidance from knowledgeable music experts.
  11. After the final round, the main results will be announced.
  12. If participants from outside Pune are selected, their travel and accommodation expenses will be covered by the Baithak Foundation.
  13. The entry fee for the competition is ₹500.

For the first round, the participating teams will have to submit their videos through Google Drive/WhatsApp/YouTube. The second and final round will happen as a performance in the Pune Kabir Festival on 1st February 2025.

स्पर्धेची नियमावली: गायन

  1. स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील सर्व नियम व्यवस्थित वाचावेत.
  2. एका समूहात 3 ते 8 विद्यार्थी भाग घेऊ शकतात.
  3. स्पर्धेची वयोमर्यादा – 8 वर्ष ते 16 वर्ष असेल.
  4. या समूह गायन स्पर्धेमध्ये संत कबीरांच्या व इतर संतांच्या कोणत्याही रचना तुम्ही गाऊ शकता.
  5. खाली दिलेला फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर असेल.
  6. हा फॉर्म भरल्यानंतर बैठक फॉउंडेशन कडून शाळांना संपर्क साधला जाईल.
  7. मुलांकडून हे गाणे बसून घेऊन त्या गाण्याचा व्हिडिओ आपल्याला 20 डिसेंबरच्या आधी पाठवायचा आहे.
  8. या स्पर्धेचा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केला जाईल.
  9. स्पर्धेची अंतिम फेरी पुणे कबीर महोत्सवच्या एका कार्यक्रमात पार पडेल.
  10. अंतिम फेरी पूर्वी ह्या निवडक स्पर्धकांना काही जाणकार संगीत तज्ञांचे मार्गदर्शन देखील मिळेल.
  11. अंतिम फेरीनंतर मुख्य निकाल जाहीर होईल.
  12. पुण्याबाहेरील स्पर्धकांची निवड झाल्यास त्यांच्या प्रवासाचा व पुण्यात राहण्याचा खर्च बैठक फाउंडेशन तर्फे घेण्यात येईल.
  13. स्पर्धेचे प्रवेश शुल्क 500 रु असेल.

स्पर्धेच्या प्रथम फेरीसाठी स्पर्धक समुहांना गुगल ड्राईव्ह /व्हॉट्सऍप/युट्युब वरून व्हिडिओ पाठवायचा आहे. दुसरी आणि अंतिम फेरी पुण्यात, पुणे कबीर महोत्सवा दरम्यान १ फेब्रुवारी २०२५ ला होईल.

Competition Rules: Dance

  1. All participants must read the following rules carefully.
  2. Each group can consist of 3 to 8 students.
  3. The age limit for the competition is 8 to 16 years.
  4. The dance performance can be based on any composition by Saint Kabir or other saints.
  5. Participants can use any classical style as a foundation for their dance structure (Bharatanatyam, Kathak, Odissi).
  6. There will be no separate prizes for different dance styles.
  7. The last date to submit the form is November 30.
  8. After submitting the form, the Baithak Foundation team will contact the schools/Centre/Organisation.
  9. A video of the group dance must be submitted by December 20.
  10. The results of the competition will be announced in the first week of January.
  11. The final round of the competition will take place during one of the events of the Pune Kabir Festival.
  12. The main results will be announced after the final round.
  13. For participants coming from outside Pune, their travel and accommodation expenses will be covered by the Baithak Foundation.
  14. The entry fee for the competition is ₹500.

For the first round, the participating teams will have to submit their videos through Google Drive/WhatsApp/YouTube. The second and final round will happen as a performance in the Pune Kabir Festival on 1st February 2025.

स्पर्धेची नियमावली: नृत्य

  1. स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील सर्व नियम व्यवस्थित वाचावेत.
  2. एका समूहात 3 ते 8 विद्यार्थी भाग घेऊ शकतात.
  3. स्पर्धेची वयोमर्यादा – 8 वर्ष ते 16 वर्ष असेल.
  4. या समूह नृत्य स्पर्धेमध्ये संत कबीरांच्या व इतर संतांच्या कोणत्याही रचनेवर नृत्य प्रस्तुती करू शकता.
  5. या स्पर्धेमध्ये आपण कोणत्याही शास्त्रीय शैलीचा आधार घेऊन नृत्य संरचना बसवू शकता.
    ( भरतनाट्यम, कथक, ओडीसी )
  6. प्रत्येक नृत्यशैलीत वेगळे पारितोषिक दिले जाणार नाही.
  7. खाली दिलेला फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर असेल.
  8. हा फॉर्म भरल्यानंतर बैठक फॉउंडेशन कडून शाळांना संपर्क साधला जाईल.
  9. विद्यार्थ्यांच्या समूह नृत्याचा व्हिडिओ करून 20 डिसेंबर पर्यंत पाठवायचा आहे.
  10. या स्पर्धेचा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केला जाईल.
  11. स्पर्धेची अंतिम फेरी पुणे कबीर महोत्सवच्या एका कार्यक्रमात पार पडेल.
  12. अंतिम फेरीनंतर मुख्य निकाल जाहीर होईल.
  13. पुण्याबाहेरील स्पर्धकांची निवड झाल्यास त्यांच्या प्रवासाचा व पुण्यात राहण्याचा खर्च बैठक फाउंडेशन तर्फे घेण्यात येईल.
  14. स्पर्धेचे प्रवेश शुल्क 500 रु असेल.

स्पर्धेच्या प्रथम फेरीसाठी स्पर्धक समुहांना गुगल ड्राईव्ह /व्हॉट्सऍप/युट्युब वरून व्हिडिओ पाठवायचा आहे. दुसरी आणि अंतिम फेरी पुण्यात, पुणे कबीर महोत्सवा दरम्यान १ फेब्रुवारी २०२५ ला होईल.

स्पर्धेची पारितोषिके

प्रथम पारितोषिक – 10,000/-
द्वितीय पारितोषिक – 7,000/-
तृतीय पारितोषिक – 5,000/-

To know more, please contact:

Kasturi: 8-7-6-7-1-2-0-4-7-0

Atharva: 9-1-4-6-6-3-0-5-6-9

अधिक माहितीसाठी संपर्क:


कस्तुरी: ८-७-६-७-१-२-०-४-७-०

अथर्व: ९-१-४-६-६-३-०-५-६-९


Let the wisdom of Kabir shine through your children!