11 फेब्रुवारी 2019 रोजी दीपगृह अकॅडमी येथे अरुंधती पटवर्धन यांचे भरतनाट्यम ह्या नृत्यप्रकाराचे सादरीकरण झाले. अरुंधती ताई व त्यांची शिष्या प्राजक्ता पवनस्कर यांनी भरतनाट्यमच्या चार रचना सादर झाल्या. ऐंशी च्या आसपास मुलं व शिक्षक होते. ताईंनी सर्वप्रथम भरतनाट्यम व भारतातील इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांची माहिती सांगितली व त्याच्यानंतर भरतनाट्यम त्या सगळ्या पेक्षा कसे वेगळे आहे हे प्रत्यक्ष डान्स मधून दाखवले. ताईं बरोबर त्यांची शिष्या ही होती, दोघींनी मिळून भरतनाट्यम मधील वेगवेगळे प्रकार मुलांना दाखवले व त्याची माहितीही दिली. त्यानंतर मुलांना काही भरत नाट्य मधल्या सोप्या सोप्या मुद्राही शिकवल्या व मुलांनी आणि शिक्षकांनी मजेने केले.
सादरीकरणानंतर मुलांच्या मनात विविध प्रश्नांची निर्मिती झाली व त्यांनी ताईंना ते प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. अनेक प्रकारच्या शंका तेथे उपस्थित झाल्या त्यांच्या पोषाखा पासून ते त्यांच्या शैली पर्यंत व त्यांच्या कारकिर्दीबद्दल ही मुलांनी प्रश्न विचारले, अत्यंत योग्य मुलांना समजेल अशा शब्दात ताईंनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. भरतनाट्यम मधून मानव व निसर्ग यांचे नाते कसे दाखवता येते हेही ताईंनी करून दाखवले. विविध प्रकारचे कथाकथन काही शास्त्रीय दृष्टिकोन आणि त्याचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व हे ताईंनी मुलांना पटवून दिले. बऱ्याच मुलांना प्रत्यक्ष काही मुद्रा करून बघीतल्या मुळे त्या नृत्यप्रकारात रसही उत्पन्न झाला व तसेच शिक्षकांनी हे अनेक प्रश्न ताईंना विचारले.
ताईंचा पुढील कार्यक्रम त्याच दिवशी साडेपाच ते साडेसहा ती सिटी ऑफ चाइल्ड येथे झाला. ताईंनी दुपारच्या सादरीकरण यापेक्षा काही वेगळे ट्रॅक्स ची निवड करून सादरीकरण केले. इथले मुलांची संख्या जरी कमी असली तरी वातावरण फारच सुंदर होते व ताईंना ही सादर करताना आनंद झाला. इथे अनेक प्रकारच्या शंका मुलांनी उत्पन्न केल्या व ताईंनी त्या शंकांचे मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत निरसन केले. दोन्ही कार्यक्रमांमध्ये मुलांचे मनोरंजन व अभ्यास आणि आनंदही खूप झाला, व त्यांनी ताईंना परत यावे अशी विनंती ही केली!
- Written by Apoorva Petkar a Baithak Volunteer
Leave a Reply